Tur Market : तुरीचे दर यंदा तेजीतच राहणार

Anil Jadhao 

सरकारने यंदा तूर उत्पादन ३९ लाख टनांवर स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला. मागील हंगामात ४३ लाख ५० हजार टन उत्पादन झालं होतं.

बाजारातील जाणकारांनीही यंदा तूर उत्पादन २७ ते ३० लाख टनांच्या दरम्यान राहीलं, असा अंदाज व्यक्त केला. तर उद्योगाच्या मते ३२ ते ३५ लाख टनांपर्यंत उत्पादन होईल.

भारताला वर्षाला ४५ लाख टन तुरीची गरज असते. त्यामुळं बाजाराची खरी दिशा आयातीवरून ठरेल.

मागील हंगामात सरकारनं ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली होती. यंदाही याच दरम्यान आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशातील उत्पादन ३५ लाख टन पकडलं तरी पुरवठा ४४ लाख टनांच्या दरम्यान होईल.

देशाची गरजही ४५ लाख टनांच्या दरम्यान आहे. म्हणजेच पुरवठा जास्त असणार नाही. त्यामुळं बाजारातील तुरीचे दर हे शेतकरी विक्री कशी करतात यावर अवलंबून आहेत.

यंदा तुरीला प्रतिक्विटल सरासरी ६ हजार ८०० हजार ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं तूर विकावी, असं आवाहन तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.