Tur Import : मुक्त तूर आयात धोरणाचा बाजारावर परिणाम होणार?

Anil Jadhao 

मागीलवर्षी सरकारने तुरीसाठी ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांपेक्षाही कमी दर मिळाला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली.

Tur Rate | Agrowon

लागवड कमी झाल्याचे पाहून स्टाॅकिस्ट आणि उद्योगांनी नफेखोरी सुरु केली होती. त्यामुळे तुरीला ७ हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळतो आहे.

Tur Rate | Agrowon

शेतकऱ्यांना चांगाल भाव मिळाला नाही म्हणूनच यंदा लागवड कमी झाल्याचे उद्योगाचेही म्हणणे आहे. पण सरकारने यातून धडा घेतला नाही.

Tur Rate | Agrowon

सरकारने मुक्त आयात धोरणाला आता एक वर्षाची मुदतवाढ दिली. आता २३ मार्च २०२४ पर्यंत तूर आयातीवर बंधने नसतील. म्हणजेच यंदाही गेल्यावर्षीएवढीच तूर आयात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tur Rate | Agrowon

जागतिक पातळीवर १० लाख टनांपेक्षा जास्त तूर उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. कारण भारत वगळता इतर देशांमध्ये आहारात तुरीचा वापर होत नाही.

Tur Rate | Agrowon

देशात ३२ ते ३५ लाख टनांपर्यंतच उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. हा दर टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

Tur Rate | Agrowon
Tur Rate | Agrowon