Turmeric Harvest : हळद काढणी आली अंतिम टप्प्यात

Team Agrowon

जिल्ह्यात हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यावर्षात अनेक शेतकऱ्यांना हळदीच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. हळदीचे दरही घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Turmeric Harvest | Agrowon

हमखास उत्पादन देणारे व नगदी पीक असल्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी हळदीच्या लागवडीमध्ये वाढ केली. यावर्षी सततच्या पावसामुळे तसेच हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येत आहे.

Turmeric Harvest | Agrowon

सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. हळद हे हमखास उत्पादन देणारे पीक असले तरी हे पीक अतिशय खर्चिक आहे. यावर्षी हळद काढणीचा खर्चही जास्त लागला. . हळदीचा दर पाच हजार ते साडेपाच हजाराच्या दरम्यान आहे.

Agrowon

यावर्षी मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे भाववाढ होणार नाही असे हळद खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Turmeric Harvest | Agrowon

यावर्षी हळदीचा उतारा १५ ते २० क्विंटलदरम्यान येत आहे. दरवर्षीपेक्षा पाच ते १० क्विंटलपर्यंत घट आलेली आहे.

Turmeric Harvest | Agrowon

यावर्षीचा उतारा व हळदीचे दर पाहता येत्या वर्षात लागवडीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Turmeric Harvest | Agrowon
Ice apple | Agrowon