Uddhav Thackeray Barsu : उद्धव ठाकरे बारसूमध्ये, दौऱ्यापूर्वीच तापले वातावरण

Team Agrowon

रिफायनरीला विरोध

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील प्रस्ताविक रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध असून मागील काही दिवसांपासून स्थानिक शेतकरी आंदोलन करीत आहेत

Uddhav Thackeray Barsu | agrowon

शिवसेनेचा पाठिंबा

रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलनास शिवसेनेने ( ठाकरे गट) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरू झाला आहे

Uddhav Thackeray Barsu | agrowon

ठाकरेंचा कोकण दौरा

प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची भावना समजून घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत

Uddhav Thackeray Barsu | agrowon

ग्रामस्थांशी संवाद

उद्धव ठाकरे यांनी आज बारसू, सोलगाव आणि आजाबाजूच्या गावांचा दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

Uddhav Thackeray Barsu | agrowon

कातळशिल्प परिसराची पाहणी

उद्धव ठाकरे यांनी कातळशिल्प परिसराची पाहणी केली. तसेच या परिसराचा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश करण्याची मागणी केली  

Uddhav Thackeray Barsu | agrowon

समर्थकांचा मोर्चा

सिंधुदुर्गमधील रिफायनरी समर्थक राजापूरमध्ये एकत्र जमले. तिथे त्यांनी प्रकल्पाच्या बाजूने घोषणाबाजी केली. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला.

Uddhav Thackeray Barsu | agrowon

प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील रिफायनरी गुजरातला न्या, आणि महाराष्ट्रातून तिथे गेलेला वेदांता, एअरबस प्रकल्प परत आणा’’, असा खोचक सल्ला दिला

Uddhav Thackeray Barsu | agrowon
weather report | agrowon