Team Agrowon
वातावरणातील तापमानामुळे जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढते. जिवाणू जितके जास्त असतील तितका दूध टिकून राहण्याचा काळ कमी होतो.
कच्चे दूध कोणत्या प्रतीचे आहे, त्यावरून त्यापासून बनणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रत ठरत असते.
दूध उत्पादन हे मुख्यतः ग्रामीण भागामध्ये जास्त उत्पादित होत असल्यामुळे हे दूध तालुकासंघ व जिल्हासंघ यांच्याकडे आणले जाते.
वाहतुकीमुळे दुधाची प्रत खालावण्याची शक्यता जास्त असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेवर जास्त लक्ष देणे गरजेचे असते.
संकलन केंद्रावर खालील चाचण्यांची पूर्तता झाल्यानंतरच दुधाची स्वीकृती केली जाते. अन्यथा दूध परत पाठविले जाते.
या चाचण्या दूध संकलन केंद्राच्या प्लॅटफार्मवरच घेतल्या जातात. त्यामुळे त्यांना ‘‘प्लॅटफाॅर्म चाचणी‘‘ असे सुद्धा म्हणतात.