Mumbai Morcha: महाविकास आघाडीच्या मोर्चात विविध संघटना सहभागी

Anil Jadhao 

महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. मार्चाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं नेत्यांनी सांगितलं.

या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत.

महाविकास आघाडीचा तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. या मोर्चाला विविध संगठनांसह कामगार संघटनांनीही पाठींबा दिलाय.

महाविकास आघाडीचे प्रमुख नेते 12 वाजेपर्यंत मोर्चात सहभागी होणार आहेत.

जे जे फ्लायओव्हरवरुन हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ येऊन थांबणार आहे.

या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

cta image