Team Agrowon
भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात होते.
तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई पिकातून मिळते. पपई फळ उपयुक्त आहेच याशिवाय प्रक्रिया उद्योगातही पपईला महत्व आहे.
पपईपासून टुटी-फ्रुटी, जॅम, जेली इ. पदार्थ तयार होतात तर पपईच्या पेपेनपासून औषधे, च्युईंगम तयार करतात.
त्यामुळे निर्यातीतही पपईला चांगल्या संधी आहेत. अशा उपयुक्त पपई च्या लागवडीसाठी बिहार राज्यात अनुदान दिले जात आहे.
नंदुरबार जिल्ह्याची ओळख पपई हब म्हणून आहे.
यंदा नंदुरबारमध्ये ११ रुपये प्रति किलोने व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावरून पपई खरेदी करत आहेत.
ढगाळ वातावरण आणि पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.