Nature Photography : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील भटकंती

मनोज कापडे

महावृक्ष वडाला आलेली लालभडक रंगीत फळे. पक्षी ती आवडीने खातात. आम्ही लहानपणी पारंब्या खेळायचो आणि भूक लागली की ही पिकलेली वडफळे खात असू. आजच्या पिढीला वड, सूर पारंब्या, वडफळे या गोष्टी माहीत नाहीत.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेला हा वड माझे आश्रयस्थान आहे.

Nature Photography | Manoj Kapde

काल मुलाच्या शाळेत गेलो होतो; तेथील तळ्यात एक फुल वाढत आहे..!

Nature Photography | Manoj Kapde

काल भटकंतीत या खोपीवर प्रसन्न मुक्काम झाला..!

Nature Photography | Manoj Kapde

वयोवृद्ध आणि ज्येष्ठ पर्वताचे हे छायाचित्र..!

Nature Photography | Manoj Kapde

डोळे उघडे असल्यास भौतिक सुखाचे मार्ग दिसतात; मात्र डोळे मिटून घेतल्यास असीम मनःशांतीचे महामार्ग दिसतात.

Nature Photography | Manoj Kapde

काही पूर्वजांनी भौतिक सुखासाठी आलिशान महाल बांधले; पण काही पूर्वजांनी मनःशांतीकरीता अखंड आणि अविचल ध्यानधारणा करण्यासाठी पाषाण कोरून ध्यान केंद्रे उभारली...!

Nature Photography | Manoj Kapde

महाराष्ट्राची वैभवशाली शिल्पकला..!

Nature Photography | Manoj Kapde

आमच्या गावचा हा रस्ता. ३०-४० वर्षांपूर्वी गावकरी एकटे दुकटे जायला घाबरायचे आता जलदगती महामार्ग झाला आहे. सूर्य तेथेच आहे; आम्ही बदलत आहोत...!

Nature Photography | Manoj Kapde
Chana | Agrowon