Fruit crop Mulching : फळबागेत आच्छादन करण्याचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

बाष्पीभवनामुळे जमिनीतील सुमारे ७० टक्के ओलावा निघून जातो. त्यासाठी आच्छादन फायदेशीर ठरतं.

Fruit crop Mulching | Agrowon

आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याची बचत होते. पाऊस व वारा यापासून जमिनीची होणारी धूप थांबते.

Fruit crop Mulching | Agrowon

तणांची वाढ होत नाही. जमिनीच तापमान नियंत्रित राहत. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.

Fruit crop Mulching | Agrowon

झाडांना अतिरिक्त ताण बसत नाही. त्यामुळे झाडाची उत्पादकता, फळांचे उत्पादन आणि दर्जा सुधारतो. खतांचा व पाण्याचा वापर योग्यप्रकारे करता येतो.

Fruit crop Mulching | Agrowon

आच्छादनामुळे झाडाभोवती सूक्ष्म वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया वेगाने आणि सुरळीत पार पडते.

Fruit crop Mulching | Agrowon

नैसर्गिक घटक असलेले आच्छादन वापरल्यामुळे कालांतराने त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ होऊन सेंद्रिय घटकांच प्रमाण वाढतं.

Fruit crop Mulching | Agrowon
Onion Rate | Agrowon