Animal Care : जनावरांना चिलेटेड खनिजे देण्याचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात दुधवाटे खनिजे बाहेर पडत असतात. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियमचा ह्रास मोठ्या प्रमाणात होत असतो.

Animal Care | Agrowon

जनावरांच्या उत्तम निरोगी वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी (milk production), गर्भाच्या वाढीसाठी खनिजांची आवश्यकता असते.

Animal Care | Agrowon

क्षारांच्या कमतरतेमुळे जनावरे वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. यासाठी जनावरांच्या आहारात क्षार मिश्राणांचा समावेश करण गरजेचं ठरत.

Animal Care | Agrowon

जनावरांना आपल्याकडे उपलब्ध होणारा विविध प्रकारचा चारा दिला जातो. चाऱ्यातील घटकांचे प्रमाण जमिनीची सुपीकता, पिकांना दिली जाणारी खते यानुसार बदलत असते.

Animal Care | Agrowon

सर्वसाधारणपणे द्विदल चाऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पटकन वाढ होणाऱ्या हिरव्या कोवळ्या चाऱ्यात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते. चारा कोरडा होत आला कि, त्यातील स्फुरदचे प्रमाण कमी होत जाते.

Animal Care | Agrowon

कोणत्याही खनिजाला चिलेटेड करणे म्हणजे, त्याचे रुपांतर सेंद्रिय रेणूमध्ये करणे होय. चांगल्या प्रतीच्या चिलेटेड खनिजावर कुठलयही प्रकारचा धन किंवा ऋण भार नसतो. याचमुळे ही खनिजे रुमेनमध्ये स्थिर राहतात.

Animal Care | Agrowon
Mango emi | Agrowon