Vegetable Crop : वेलवर्गीय भाज्यांसाठी मंडप किंवा ताटी पद्धत वापरण्याचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून चार ते सहा फूट उंचीवर वाढतात.त्यामुळे पाणी आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागत नाही.

Vegitable crop | Agrowon

फळे लोंबकळती  राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते.हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो.

Vegitable crop | Agrowon

फळांची तोडणी कीडनाशके फवारण्याची कामे सुलभ होतात.

Vegitable crop | Agrowon

दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकापेक्षा उत्पादनामध्ये अडीच ते तीन पट वाढ होत असल्याचे प्रयोगातून दिसून आले आहे.

Vegitable crop | Agrowon

फळांचा एक सारखा आकार त्यावरील बारीक लव इजा न होता तशीच राहिल्यामुळे फळे ताजीतवानी दिसतात.

Vegitable crop | Agrowon

मंडपावर वेली सहा ते सात महिने चांगल्या राहतात.तर जमिनीवर लवकरच खराब होतात किंवा जास्त काळ टिकत राहतात.

Vegitable crop | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.