Animal Care : वाढलेल्या खुरांमुळे जनावरांवर काय परिणाम होतात?

Team Agrowon

जनावरांच्या खुरांची वाढ

जनावरांच्या खुरांची वाढ होणे ही एक नैसर्गिक आणि सततची प्रक्रिया आहे. जी जनावरे सतत चालतात किवा श्रमाची कामे करतात त्या वेळी खुरांचे जमिनीशी घर्षण होऊन ती प्रमाणात वाढतात.

Animal Care | Agrowon

अयोग्य व्यवस्थापन

अयोग्य व्यवस्थापनामुळे तसेच अतिशय छोट्या बंदिस्त जागेत जनावरांना बांधून दुग्ध व्यवसाय करणे, व्यवस्थित काळजी न घेणे, वेळेवर खुरांची छाटणी न करणे आणि व्यायामाचा अभावामुळे खुरांची अतिरिक्त वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Animal Care | Agrowon

खुरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

जनावरांच्या खुरांच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते कारण या आजाराचा त्यांच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर होणारे परिणाम चटकन लक्षात येत नाहीत.

Animal Care | Agrowon

सक्षम खूर व्यवस्थापन प्रक्रिया

खुरांची समस्या आपण पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी सक्षम खूर व्यवस्थापन प्रक्रिया राबवून या समस्येवर मात करता येते.

Animal Care | Agrowon

खूर वाढीमुळे होणारे परिणाम

खुरांची अतिरिक्त वाढ झाल्यामुळे जनावरे चालण्यास असमर्थ होतात. जनावरांच आहार घेणं कमी होतं त्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता कमी होते. खुरांमध्ये जखमा झाल्यामुळे जनावरे लंगडतात. जखमेतून रोगजंतूचा शरीरात प्रसार होतो. मादी जनावरे माज दाखवत नाहीत तर नर जनावरे प्रजननात उदासीनता दाखवतात.

Animal Care | Agrowon

समस्येवर उपचार करताना

जनावरांच्या अतिरिक्त खुरांची पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य प्रकारे आणि योग्य अंतरावर कापणी करावी. नाहीतर रक्तस्राव होऊन त्यात जखम होऊ शकते. जनावरांना एकच जागेवर जास्त काळ बांधू नये. शक्य असल्यास जनावरांना थोडा काळ चरण्यासाठी सोडाव जेणेकरून खुरांची झीज होऊन ती अमर्याद वाढणार नाहीत.

Animal Care | Agrowon

गोठ्यातील व्यवस्थापन

कमी जागेत जास्त जनावरे ठेवू नयेत. गोठ्यातील पृष्ठभाग हा एकदम गुळगुळीत किवा मऊ नसावा. खुरांतील जखम कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. शेण, गोमूत्राचा जखमेशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करावा.

Animal Care | Agrowon
Pandharpur Ashadhi Wari | Agrowon