Alibag White Onion : अलीबागच्या पांढऱ्या कांद्याची वैशिष्ट्ये काय आहेत?

Team Agrowon

अलिबाग शहरालगत असलेलं कार्ले नावाचं छोटं गाव पांढऱ्या कांद्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.

Alibag White Onion | Agrowon

अलिबागच्या कांद्याचं जगात एकमेवाद्वितीय असलेलं वैशिष्ट्य म्हणजे हा कांदा कधीच सुटा विकला न जाता माळेच्या रूपातच विकला जातो.

Alibag White Onion | Agrowon

सुमारे ९० दिवसांत कांदा पक्व होतो. त्याचे आंतरपीक घेतले जात नाही. काढणीनंतर थेट पुढील खरीप हंगामातच भात घेतला जातो.

Alibag White Onion | Agrowon

अलिबाग भागातील जमिनींमध्ये गंधकाची कमतरता आहे. त्यामुळेच या मातीतील कांदा गोड लागतो.

Alibag White Onion | Agrowon

तिखटपणाशी संबंधित आणखी एक घटक म्हणजे पायरुविक ॲसिड. अलिबागच्या विशेषतः ओल्या कांद्यात त्याचेही प्रमाण कमी असते. साठवणुकीत त्याचे प्रमाण थोडे वाढते.

Alibag White Onion | Agrowon

अलीकडील काळात या कांद्याला मागणी वाढल्याने क्षेत्रही वाढलं आहे.

Alibag White Onion | Agrowon
Agricultural Drone | Agrowon