Honey Bee Keeping : मधमाशीपालन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

Team Agrowon

मधमाशीपालनामध्ये मधपेट्यांसाठी योग्य जागेची निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मधपेट्या शेतामध्ये सावलीत, प्रवाही पाणी असलेल्या ठिकाणी ठेवाव्यात.

Bee Keeping | Agrowon

मुंग्या लागणार नाहीत, वाऱ्याचा सरळ झोत न येणारी, समपातळीत जमीन असलेल्या ठिकाणीच मधपेट्या ठेवाव्यात.

Bee Keeping | Agrowon

मधमाशीपालनास किमान ५ मधपेट्या ठेवून सुरुवात करावी. मधमाशीपालनाच्या योग्यपद्धतीची निवड करून व्यवसायास सुरुवात करावी.

Bee Keeping | Agrowon

मधमाश्‍या फुलातील मकरंद किंवा गोड द्रवाचे जिभेने शोषण करतात. हा मकरंद पोटात साठविला जातो. माश्‍यांच्या लाळग्रंथीतून काही प्रारक मकरंदात मिसळतात आणि त्यातील शर्करेचे साध्या शर्करेत रूपांतर होते.

Bee Keeping | Agrowon

जेव्हा मध परिपक्व होतो तेव्हाच मधमाश्‍या साठवण कोष सीलबंद करतात. इतरवेळी ती उघडीच असतात.

Bee Keeping | Agrowon

शरीराच्या मागील बाजूच्या तळभागावर असलेल्या मेणग्रंथीद्वारे मेणाचा स्राव करतात. मधमाश्‍यांना थोडेसे मेण तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात मधाचे प्राशन करावे लागते.

Bee Keeping | Agrowon
Animal Market | Agrowon