Vietnam Agriculture : व्हिएतनाममध्ये कोणती पिकं घेतली जातात?

महारुद्र मंगनाळे

गावातून एक छोटासा खळाळता ओढा वाहतोय.अगदी आमच्या होम स्टे समोरून.ओढ्यावर तीन-चार ठिकाणी महिला कपडे धुताना बघितल्या.

Maharudra Mangnale

पण पाणी कुठचं घाण नाही.ते वेगात वाहतयं.या पाण्यावर प्रत्येकाची एक परसबाग आहे.कोबी,केळी,पपई ,रताळे,मुळा व इतर दोन-तीन प्रकारच्या पालेभाज्या, झाडं मला दिसली.

Maharudra Mangnale

या कामातही महिलाच आघाडीवर आहेत.श्रीमंत, मध्यमवर्गीय, कष्टकरी,निम्नस्तरीय असे लोक मला इथं दिसताहेत.पण सगळेच आपापल्या कामात व्यस्त आणि मस्त दिसताहेत.

Maharudra Mangnale

मरगळलेले,उदासवाणे,नैराश्यग्रस्त,दारू चेहऱ्यावर उतरलेले लोक मला दिसले नाहीत.इथंही कुठंच स्पीकर नाही, आरडाओरडा नाही,गोंधळ नाही.नदीच्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणं याचंही जगणं वाहतं आहे.

Maharudra Mangnale

व्हिएतनामी माणसं खूप काम करतात तशी भरपूर खातात.जेवणात मांस,माशाचे विविध प्रकार असतात,तशाच हिरव्या पालेभाज्या.

Maharudra Mangnale

कच्च्या आणि उकडलेल्या.त्याही कचाकच खातात.मीही इथं आल्यापासून चव न बघता भरपूर हिरवा पाला खातोय.कदाचित यामुळंच व्हिएतनामी स्त्री-पुरूषांच्या तब्येती दणकट दिसतात.

Maharudra Mangnale
Wedding | Agrowon