Team Agrowon
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे.
गट शेती, क्लस्टर बरोबरच नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. Kaneri Math
राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.