Effect Of Summer On Calf : तापमानवाढीचा लहान वासरांवर काय परिणाम होतो?

Team Agrowon

वासरांतील हगवण

लहान वासरांची प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे विविध आजारांना बळी पडतात. त्यामध्ये हगवणीचा समावेश होतो. साधारणतः एक ते तीन महिन्यापर्यंतची वासरे हगवणीने जास्त प्रमाणात बाधित होतात.

Effect Of Summer On Calf | Agrowon

वासरांतील हगवणीचे परिणाम

हगवण साधारणपणे जिवाणूंमुळे, तसेच विषाणू किंवा पोटातील जंतांमुळे होते. हगवणीमुळे वासरू अशक्त होते, त्याची वाढ खुंटते, डोळे खोल जातात, वजन कमी होते आणि काही वेळा ते मृत्युमुखी पडते.

Effect Of Summer On Calf | Agrowon

रोगकारक जंतू ई. कोलाय

कोलाय ब्यासिलोसिस किंवा पांढरी हगवण हा वासरांना अधिक प्रमाणात आढळणारा आजार आहे. रोगकारक जंतू ई. कोलाय हे बऱ्याच वेळेला लहान आतड्यामध्ये नेहमीच असतात, परंतु त्यांना जेव्हा पोषक वातावरण मिळते तेव्हा ते शरीरात रोग निर्माण करतात.

Effect Of Summer On Calf | Agrowon

हगवणीची कारणे

पांढऱ्या हगवणीमुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लहान वासरांमध्ये दोन ते पन्नास टक्क्यांपर्यंत असू शकते. हगवणीची इतरही काही कारणे असू शकतात, जसे की दुधाचे सेवन जास्त प्रमाणात केल्यामुळे किंवा नवजात वासराला चीक कमी पाजल्यामुळे देखील हगवण लागते.

Effect Of Summer On Calf | Agrowon

हगवणीची कारणे

गोठ्यातील अस्वच्छता, विपरीत हवामान, तसेच जनावरांच्या शरीरावरील ताण ही कारणे देखील वासराला हगवणीसाठी कारणीभूत असू शकतात. काही वेळा लहान वासरांना जंतामुळे हगवण होते.

Effect Of Summer On Calf | Agrowon

लहान वासराची विष्ठा तपासणी

जंताचा प्रादुर्भाव गाईकडून वासराला होतो. त्यामुळे लहान वासराची विष्ठा तपासणी तसेच गाईला गर्भधारणेपूर्वीच जंतनाशके देणे फायदेशीर ठरते.

Effect Of Summer On Calf | Agrowon
PM Kisan | Agrowon