Swapnil Shinde
महाराष्ट्र राज्य सरकारने गरजू लोकांना आजारपणातील उपचारासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू केली आहे.
त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपब्लध करून दिला जाणार आहे.
वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दिला जाणार आहे.
विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.