Team Agrowon
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली.
23 मे पासून बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून आणि जमा करता येणार आहेत.
एकावेळी फक्त २० हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जातील.
RBI चे हे पाऊल नोव्हेंबर 2016 च्या अनपेक्षित घोषणेपेक्षा थोडे वेगळे आहे.
त्या घोषणेच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १ हजार रुपयांच्या तत्कालीन नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या होत्या. त्याच वेळी आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटा जारी केल्या.
मुदत संपल्यानंतरही लोकांनी या नोटा आपल्याकडे ठेवल्या तर त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
इतर मूल्यांच्या नोटा बँकांकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने लोकांना नोटा देण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
जर एखाद्या बॅंकेने नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास. तक्रारदार cms.rbi.org.in वर रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत तक्रार नोंदवू शकतो.