Grape Farming : पावसामुळे द्राक्ष बागेवर काय परिणाम झाले?

Team Agrowon

बऱ्याचशा बागेत फळकाढणीला उशीर असेल किंवा मण्यात नुकतेच पाणी उतरलेले असेल, अशा स्थितीत पाऊस थोडा जास्त प्रमाणात झालेला असल्यास मण्याचे क्रॅकिंग होऊ शकते.

Grape Cracking | Agrowon

ज्या अवस्थेत बागेत आपण पाणी कमी करतो, त्या अवस्थेतच नेमका पाऊस झाला असल्यास वेलीला प्रमाणापेक्षा पाणी जास्त होऊ शकतं. त्याचा दाब मण्यांवर येण्याची शक्यता असते. त्यामुळे मणी तडकण्याची शक्यता वाढेल.

Grape Cracking | Agrowon

फळकाढणीच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस झाला व नंतर उन्हे पडून वातावरण कोरडे होण्यास सुरुवात झाल्यास मणी तडकण्याची शक्यता कमी राहील.

Grape Cracking | Agrowon

ढगाळ वातावरण असल्यास पाऊस येण्यापूर्वी याची फवारणी करावी. बागेत पुरेसे पाणी दिलेले असल्यास मणी क्रॅकिंगची समस्या काही प्रमाणात टाळता येईल.

Grape Cracking | Agrowon

द्राक्षाच्या वाढीच्या अवस्थेचा विचार करता व ढगाळ वातावरण किंवा पुढील पावसाचा अंदाज घेऊन बागेत पाणी देण्याचे नियोजन करावं.

Grape Cracking | Agrowon

मुख्यतः मण्याच्या सालीची लवचिकता व्यवस्थित असल्यास मणी तडकण्याची शक्यता कमी होते. यासाठी कायटोसॅनसारख्या घटकांचा वापर फायद्याचा ठरेल.

Grape Cracking | Agrowon
Soybean Production | Agrowon