Team Agrowon
निरुखे गाव शिवारात जांभळाच्या तीन वैशिष्टपूर्ण जाती मिळाल्या आहेत.
त्यांची कलमे तयार केली असून, विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड झाली आहे.
विद्यापीठाने दुर्लक्षित पिकांच्या संवर्धनासाठी समूह शेती प्रकल्प हाती घेतला आहे.
यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
त्यामुळे दुर्लक्षित झालेली पिके येत्या काळात आर्थिक उत्पन्नाचे साधन ठरतील.
रायगड जिल्ह्यात पपनस, नीरफणस आणि रामफळाच्या लागवडीला संधी आहे. या पिकांच्या नवीन जातींबाबतही संशोधन सुरू आहे.