Summer Crop Update : यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र का घटले?

Team Agrowon

गारपीटीमुळे पिकाचे मोठे नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणाम त्याचा फटका उन्हाळी पिकांना बसला आहे.

Summer Crop Update | Agrowon

कृषी मंत्रालय आकडेवारी

कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उन्हाळी पिकांसाठीचे क्षेत्र कमी झाले आहे. मागील वर्षी ६८ लाख ८१ हजार हेक्टर होते. ते यंदा ६७ लाख ७२ हजार हेक्टर इतके झाले आहे.

Summer Crop Update | Agrowon

उन्हाळी पीक क्षेत्राची आकडेवारी

सरकारने सोमवारी उन्हाळी पिकांखालील क्षेत्राची आकडेवारी जाहीर केली. मागील वर्षी कडधान्याचे क्षेत्र १८ लाख ८० हजरा हेक्टर होते. ते यंदा १७ हजार ६४ हजार हेक्‍टरवर पोहोचले आहे.

Summer Crop Update | Agrowon

भरड तृणधान्य

भरड तृणधान्यांचे ११ लाख ४४ हजार हेक्‍टरवरुन १० लाख ७२ हजार हेक्‍टरपर्यंत खाली आले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Summer Crop Update | Agrowon

उन्हाळी पिके

जून-जुलैमध्ये पेरलेली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढणी केलेली पिके खरीप आहेत. रब्बी आणि खरीप दरम्यान उत्पादित होणारी पिके ही उन्हाळी पिके आहेत.

Summer Crop Update | Agrowon

ज्वारी

हरभरा, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सूर्यफूल आणि तीळ ही काही प्रमुख उन्हाळी पिके आहेत.

Summer Crop Update | Agrowon

बाजरी

२०२२-२३ मध्ये १५९.१ लाख टनांवरून २०२३-२४ साठी बाजरी उत्पादनाचे उद्दिष्ट १७० लाख टन ठेवण्यात आले आहे. आंतर-पीक, पीक वैविध्य आणि उत्पादकता वाढवण्याद्वारे पीक क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.

Summer Crop Update | Agrowon
Soybean Crop | Agrowon