Team Agrowon
परभणी: जिल्ह्यातील कौडगाव ता. परभणी येथील शेतकऱ्यांनी शेत रस्त्याच्या प्रश्नी गाडी बैलासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बेमुदत उपोषण सुरू केले .
कडेगाव ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर आमच्या बाजूने का मतदान केले नाही म्हणत रस्ता अडवला आहे.
त्यामुळे शेतकरी नवनाथ लोंढे उपोषणाला बसले आहेत.
लोंढे यांच्या शेतातील उस लागवड रस्ता अडवल्यामुळे थांबली आहे.
तसेच शेतातील जनवारांचे दूधही त्यांना काढायला जाता येत नाही.
त्यामुळे तहसीलदारांकडे त्यांनी तक्रार केली आहे. आणि या पेचप्रसंगावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.