Team Agrowon
मांसाचे मूल्यवर्धन केल्यास अधिकचा नफा मिळविणे शक्य आहे.
नवीन प्रक्रिया तंत्रांचा वापर करून सहज चावता येणारे मऊ रसाळ मांस तयार करणे, कट तयार करणे, पोषण मूल्य वाढवता येते.
झपाट्याने होणारे औद्योगीकरण, शहरीकरण, खर्च करण्यायोग्य उत्पन्नात वाढ, विभक्त कुटुंब, शिक्षण आणि पौष्टिक अन्नाविषयी जागरूकता यामुळे मूल्यवर्धित उत्पादनांच्या बाजारपेठेत वाढ होत आहे.
बाजार रेट्यामुळे कच्च्या मांसामध्ये उत्पादन भिन्नता आणि मूल्यवर्धनाच्या अधिक संधी निर्माण झाल्या आहेत.
आरोग्य, पोषण आणि सोयी संबंधी ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासोबतच उद्योगाची वाढता नफा आणि वाढती व्यवहार्यता सुनिश्चित होते.
मांसाव्यतिरिक्त अन्न घटक, आरोग्याभिमुख घटक मांसामध्ये मिसळून उत्पादन खर्च कमी करता येतो.