Organic Farming : सेंद्रिय शेतीची गरज का आहे?

Team Agrowon

विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिके घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे.

Organic Farming | Agrowon

सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे. जी लहान शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आणि उपयुक्त आहे. 

Organic Farming | Agrowon

सेंद्रिय शेतीत उपलब्ध असलेल्या आणि कमी निविष्ठांमध्ये शेती करता येते.

Organic Farming | Agrowon

 युरोप, अमेरिका, चीन आदी विकसित देशातून प्रचंड प्रमाणात सेंद्रिय मालास मागणी असली तरी तेथील सेंद्रिय मालाची प्रमाणीकरण तपासणी ही कडक आहे. 

Organic Farming | Agrowon

रासायनिक खते, कीटकनाशके व अन्य औषधे यांचा अतिवापराने शेतमाल जरी दिसण्यास आकर्षक असला तरी प्रकृतीस हानिकारक ठरतो हे ग्राहकांच्या लक्षात येत आहे.

Organic Farming | Agrowon

सेंद्रिय भाजीपाला व फळे रासायनिक मालाच्या तुलनेत कमी आकर्षक असल्याने सामान्य व मध्यम ग्राहकवर्ग रासायनिक निविष्ठांचा वापर केलेल्या शेतीमालास अधिक पसंती देताना दिसतात.

Organic Farming | Agrowon
cta image | Agrowon