Team Agrowon
भारतातून दरवर्षी सुमारे दीड लाख टन जिरे निर्यात होते.
देशातील एकूण जिरे उत्पादनाशी तुलना करता हे प्रमाण २५-३० टक्के भरते.
जिरे ही वस्तू दररोजच्या जेवणात वापरात असली, तरी ती वारंवार खरेदी केली जात नाही.
खाद्यतेल किंवा अन्नधान्याच्या किमतीप्रमाणे जिऱ्याच्या किमती ग्राहकांच्या लक्षात राहत नाहीत.
जिरे वर्षअखेरीस घाऊक बाजारामध्ये ३५,००० रु. प्रति क्विंटल या विक्रमी भावपातळीवर पोहोचले आहे.
जिरे वार्षिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर राहिले असून, त्यात ९६ टक्के एवढा परतावा मिळाला आहे.