Team Agrowon
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील माणिक बबनराव फंड या शेतकऱ्याने तब्बल दीड लाख रुपये खर्च करून नवीन बैलगाडी तयार करून घेतली.
त्या गाडीला घुंगरू बसवून तिचा उपयोग शेती कामासाठी केला जात आहे. या गाडीची तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
खिल्लारी बैलजोडीने सजलेली त्यांची भारदस्त बैलगाडी तेव्हाही परिसरात चर्चेचा विषय असायची.
बैलगाडीच्या दर्शनी भागात गावाचे आराध्य दैवत असलेल्या महागणपतीची मूर्तीही आवर्जून कोरून घेतली.
चाकावर व धुऱ्या, गाडीच्या दोन्ही बाजूंवर नक्षीदार कोरीव काम केले आहे. त्यावर आकर्षक पद्धतीने रंगकाम करून ती बैलगाडी सजवली आहे.
माणिक फंड यांचे वडील रांजणगावचे कारभारी स्व. बबनराव गोपाळा फंड व पाच भाऊ आणि १८ भावांचे एकत्र कुटुंब होते.
गाडीच्या समोर मालदाऱ्या व सरदाऱ्या अशा दोन्ही बैलाची नावे टाकली आहेत.