Maize Market : मक्याचे दर टिकून राहतील का?

Team Agrowon

यंदा रब्बी हंगामात पेरण्यांसाठी पोषक हवामान होते. त्यातच लागवडीच्या काळात मक्याचे भाव तेजीत होते. त्यामुळे रब्बीत मक्याची लागवड ३ टक्क्यांनी वाढली.

Maize Market | Agrowon

यंदा देशात जवळपास २३ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याचा पेरा झाला.

Maize Market | Agrowon

रब्बीतील मका लागवड वाढली तरी केंद्र सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन १०८ लाख टनांवरच स्थिरावेल, असं म्हटलं.

Maize Market | Agrowon

मागील रब्बी हंगामात ११० लाख टनांच्या आसपास उत्पादन झालं होतं. यंदा फेब्रुवारी महिन्यात उष्णता जास्त होती.

Maize Market | Agrowon

मार्च महिन्यात देशातील अनेक मका उत्पादक भागांमध्ये पावसानं तडाखा दिला. त्याचा मका उत्पादनावर परिणाम होणार असल्याचं शेतकरीही सांगतायत.

Maize Market | Agrowon

एप्रिलमध्ये रब्बीतील मका बाजारात येईल. मक्याची काढणी सुरु झाल्यानंतर उत्पादनात नेमका किती फटका बसला हे स्पष्ट होईल.

Maize Market | Agrowon
Chilli Market | Agrowon