Jambhul Season : यंदा जांभूळ हंगाम लांबणार का?

Team Agrowon

निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व लांबत चाललेला पाऊस, तसेच वातावरणातील बदल, अवेळी पडणाऱ्या पावसाचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू उत्पादनाबरोबरच काळ्याभोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झाला आहे.

Jambhul Season | Agrowon

दरवर्षी गावरान जांभूळ बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते; मात्र जांभळाचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चाललेला आहे.

Jambhul Season | Agrowon

जांभूळ पिकण्याचा कालावधी लांबत जाऊन जून महिना उजाडतो. पावसामुळे जांभळे खराब होऊन नुकसान सहन करावे लागते.

Jambhul Season | Agrowon

यंदा जांभूळ उत्पादनात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने व ५० ते ६० टक्के उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील बागायतदार शेतकरी वर्गाने सांगितले.

Jambhul Season | Agrowon

या वर्षी अवकाळी पाऊस व बदललेले वातावरण यांचा मोठा परिणाम जांभूळ पिकावर झाला आहे. एप्रिल महिना उजाडला तरी विक्रमगड तालुक्यात जांभूळ पिकाला पाहिजे त्या प्रमाणात फळधारणा झालेली नाही.

Jambhul Season | Agrowon

जानेवारी महिन्यात जांभळांच्या झाडांना मोहर येत असतो; परंतु यंदा मोहर लांबला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे मोहर व लहान फळेही गळून पडली आहेत.

Jambhul Season | Agrowon
Dragon Fruit | Agrowon