Kabuli Chana : देशातील काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढेल का?

Team Agrowon

काही बाजारांमध्ये तर काबुली हरभऱ्याच्या दराने १५ हजार रुपये प्रतिक्विंटलचाही टप्पा पार केला होता.

Kabuli Chana | Agrowon

दुसरीकडे देशी हरभरा दबावात होता. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादीत असल्याने काबुली हरभरा तेजीत राहिला.

Kabuli Chana | Agrowon

महत्वाच्या काबुली उत्पादक देशांमध्ये उत्पादन कमी राहीले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही दर तेजीत होते. परिणामी भारतीय मालाला मागणी वाढली.

Kabuli Chana | Agrowon

गेले सहा ते सात महिने काबुली हरभऱ्याचे दर तेजीत असल्याने देशात यंदा काबुली हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळं मागील काही दिवसांपासून काबुली हरभऱ्यातील तेजी कमी झाली.

Kabuli Chana | Agrowon

सध्या काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते ११ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

Kabuli Chana | Agrowon

देशात यंदा काबुली हरभरा उत्पादन ३ लाख टनांचा टप्पा पार करेल, असा अंदाज काही व्यापारी व्यक्त करत आहेत.

Kabuli Chana | Agrowon