Dry Fish Market : खोल समुद्रातील मासेमारी बंद ; मासळी सुकविण्याकडे मच्छिमारांचा कल

Team Agrowon

मासेमारी बंद

पावसाळा काही दिवसांवर आला असून दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे.

Dry Fish Market | Agrowon

मच्छीमार

हंगामाचा शेवट चांगला करण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. मात्र पकडलेली मासळी बाजारात न विकता, सुकवून विकण्याकडे मच्छीमारांचा कल वाढत आहे.

Dry Fish Market | Agrowon

सुक्‍या मासळीची मागणी

पावसाळ्यासाठी अनेक गृहिणींकडून बेगमी करून ठेवण्यात येत असल्‍याने सुक्‍या मासळीची मागणी वाढल्‍याने दरही गगनाला भिडले आहेत.

Dry Fish Market | Agrowon

मासळी सुकवण्याचे काम

कोळीवाड्यात मासळी सुकवण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे.

Dry Fish Market | Agrowon

कोळंबी

सध्या कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे रस्त्यांवर बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकूल आणि करंदी या मासे सुकवण्यासाठी ठेवले आहेत.

Dry Fish Market | Agrowon

मासेमारीवर परिणाम

वातावरणातील बदलांमुळे खोल समुद्रातील मासेमारीवरही परिणाम झाल्याने मच्छीमारांनी मासळी सुकवण्यास प्राधान्य दिले आहे.

Dry Fish Market | Agrowon

सुक्या मासळीचे दर

सुट्टीसाठी कोकणात आलेले चाकरमानी सुक्या मासळीची बेगमी जमा करीत आहेत, मात्र वाढलेल्या किमतीमुळे खिशाला कात्री लागत आहे.

Dry Fish Market | Agrowon
Animal Care | Agrowon