Team Agrowon
राज्यात पहिल्याांदाचं एसटी महामंडळाची लालपरी चालवताना आपल्याला महिला चालक पाहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना चालक होण्याची संधी दिली आहे.
एसटी महामंडळाने महिलांना चालक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आहे.
हातात एसटीचं स्टेअरिंग आणि चेहऱ्यावर अभिमानाची भावना घेऊन बस चालवणाऱ्या या महिलांची राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे.
एसटी महामंडळामध्ये आज पर्यंत एकही महिला चालक म्हणून कार्यरत नव्हती.
परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात १७ महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिल्यांच्या हातात लालपरीचं स्टेअरिंग दिसणार आहे.