World Donkey Day : गाढवांच महत्त्व अजूनही दुर्लक्षित

Mahesh Gaikwad

जागतिक गाढव दिन

अत्यंत गरीब आणि आज्ञाधारक असणारा परंतु तितकाच दुर्लक्षित राहिलेला प्राणी म्हणजे गाढव.

World Donkey Day | Agrowon

गाढव पाळणारा समाज

महाराष्ट्रातील बहुतांशी धोबी, वडार, कुंभार, कैकाडी समजातील लोक प्रामुख्याने गाढव पाळतात. हे लोक आपल्या दैनंदिन रोजीरोटीसाठी गाढवांचा सांभाळ करून आपला उदरनिर्वाह चालवतात.

World Donkey Day | Agrowon

दैनंदिन कामासाठी गाढवांचा वापर

जवळपास पाच हजार वर्षांपासून मानवाने आपल्या दैनंदिन कामासाठी गाढवांचा वापर सुरू केला.

World Donkey Day | Agrowon

कष्टाच्या कामांसाठी गाढवांचा वापर

विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात गाढवांचा वापर ओढकाम, वाहतूक, शेती व इतर कष्टांच्या कामासाठी केला जातो.

World Donkey Day | Agrowon

पशुगणना

२०१९ च्या पशुगणनेनुसार भारतात १.२ लाख गाढवांची संख्या आहे. जी २०१२ मधील पशुगणनेच्या तुलनेत ६१.२३ टक्क्यांनी कमी झाली आहे.

World Donkey Day | Agrowon

महाराष्ट्रातील गाढवांची संख्या

महाराष्ट्रात फक्त १८ हजार गाढवे असून ती २०१२ च्या पशुगणनेच्या तुलनेत ३९.५९ टक्के इतके कमी झाले आहेत.

World Donkey Day | Agrowon

गाढवांच्या संख्या घटली

वाढते यांत्रिकिकरण आणि गाढव पाळणाऱ्या संबंधित समाजात वाढलेल्या साक्षरतेमुळे नोकरी आणि व्यवसायाकडे नवी पिढी वळाली आहे. त्यामुळे गाढवांच्या संख्येत झालेली घटीचे महत्त्वाचे कारण आहे.

World Donkey Day | Agrowon

गाढव संवर्धन

गाढव संवर्धनाबाबत आज कुठेही नेमकी माहिती उपलब्ध नाही. व्यवस्थापन, निवारा, आरोग्य, प्रजनन याविषयी सहज माहिती उपलब्ध होत नाही.

World Donkey Day | Agrowon

गाढवांचे योगदान

कष्टाळू आणि आज्ञाधारी असलेल्या या प्राण्याने मानव जातीला दिलेल्या योगदानाची आठवण व्हावी, यासाठी ८ मे हा जागितक गाढव दिवस म्हणून साजरा केला जातो.

World Donkey Day | Agrowon