Sunflower Market : जागतिक सूर्यफुल उत्पादन घटणार

Anil Jadhao 

अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सूर्यफुल आणि सूर्यफुल तेल उत्पादनाला यंदाही रशिया आणि युक्रेन युध्दाचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या हंगामात जगात ५७३ लाख हजार टन सूर्यफुल उत्पादन झाले होते. ते यंदा ५१३ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे.

२०२०-२१ मध्ये एकूण जागतिक सूर्यफुल आणि सूर्यफुल उत्पादने निर्यातीत युक्रेनचा वाटा निम्मा होता. मागील हंगामात युक्रेनमध्ये १७५ लाख टन सुर्यफुल उत्पादन झाले होते. ते यंदा १०१ लाख टनांवर स्थिरावणार अल्याचेही युएसडीएने म्हटले आहे.

यंदा जागतिक सूर्यफुल तेल उत्पादन २०१ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. मागीलवर्षी जागतिक सूर्यफुल तेल उत्पादन १९८ लाख टनांवर स्थिरावले होते. म्हणजेच यंदा उत्पादनात ३ लाख टनांची वाढ होणर आहे.

यंदा रशियातील उत्पादन जवळपास ४ लाख टनाने वाढणार आहे. मागील हंगामात रशियात ५८ लाख टन सूर्यफुल तेल उत्पादन झाले होते. ते यंदा ६२ लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

टर्कीचे उत्पादन वाढून ९ लाख टनांवरून १२ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. तर युक्रेनमधील सूर्यफुल तेल उत्पादन जवळपास साडेपाच लाख टनांनी घटून ४० लाख ८० हजार टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात युक्रेनमध्ये ४६ लाख टन सूर्यफुल तेल उत्पादन झाले होते, असेही युएसडीएने म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image