Team Agrowon
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात...भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आज जेजूरी गडावर या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या ही जल्लोषात साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळी ७ वाजता उत्सव पालखी ही कऱ्हा स्नानासाठी बाहेर काढण्यात आली. यावेळी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंतच सूर्याला अमावस्या असल्याने याच काळात खंडोबा म्हाळसाच्या उत्सव मूर्तींना स्नान कऱ्हा करणे.
सकाळी ७ वाजता सोहळ्याने प्रस्थान ठेवले. बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. भंडार खोबऱ्याच्या उधळणीत आणि देवाच्या जयघोषात पालखी ने मुख्य गडकोटला प्रदक्षिणा घालुन पालखी बालदारीत आणण्यात आली.
देवाचे मानकरी पेशव्यांनी इशारत करताच खांदेकरी, मानकरी, उत्सव मूर्तींची पालखी उचलली.
यावेळी देवाचे नित्य वारकरी आणि हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोटच्या गजरात भंडार खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली.