Lumpy Skin : मेहकर तालुक्यात दगावली १४३ जनावरे

मेहकर तालुक्यात दररोज सरासरी ५१ गुरांना लम्पी स्कीन आजाराची लागण होत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

मेहकर, जि. बुलडाणाः मेहकर तालुक्यात दररोज सरासरी ५१ गुरांना लम्पी स्कीन (Lumpy skin Disease) आजाराची लागण होत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १४३ जनावरांचा (Animal Care) मृत्यू झाला असून, २ हजार ४५७ जनावरांना लागण झालेली आहे. त्यापैकी अनेकांची स्थिती गंभीर आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीमुळे तालुक्यातील लम्पी स्कीनच्या बाबत गंभीर स्थिती चिंता वाढवणारी आहे. रविवारी सुटीचा दिवस असूनही तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हरीश ठाकरे यांनी उटी, वरवंडसह पाच गावांमध्ये जाऊन आजारी जनावरांवर उपचार केला. २१ पशुउपचार केंद्रांमधील वैद्यकीय अधिकारी ही साथ आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत १५ हजार ७८८ पशुधनाचा मृत्यू

साथीचे प्रमाण अधिक व या विभागाकडे मनुष्यबळ, औषधी कमी, लसीची परिणामकारकता कमी, साधन सामग्रीची कमतरता या प्रतिकुलतेमुळे साथरोगावर नियंत्रण मिळविणे यंत्रणेला अवघड जात आहे, असे दिसून येते. तालुक्यात ४८ हजार ६८१ लसीकरण झाले आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच डॉक्टरांनी सांगितले, की दिल्या जात असलेली लस गोटफॉर्मची म्हणजे शेळ्यांची आहे.

लम्पी स्कीनची परिणामकारक लस अद्याप कुठेच उपलब्ध झालेली नाही. एक कोटींची मल्टीव्हिटॅमिन व इतर औषधे त्वरित खरेदी करण्याचे आदेश त्यांनी उपसंचालकांना दिले होते. पण तालुक्यात औषधांची सुद्धा कमतरता जाणवत आहे.सध्या २ हजार ४५७ गुरांना संसर्गजन्य लम्पी स्कीनची लागण झालेली असून त्यापैकी १हजार १७३ गाय तर १ हजार २८४ बैल आहेत. ७६ गायी, ६७ बैल अशा १४३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : गडचिरोली जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा शिरकाव

रविवारी (ता.१३) सोनाटी येथे किमती बैलाचा मृत्यू झाला. पंचनाम्यानंतर मृत जनावरे जमिनीत पुरण्यात येत आहेत. गाय, बैल यांच्या किमती किमान एक लाखापर्यंत आहेत. रोज सरासरी लागण होण्याचे प्रमाण २५ गायी आणि २६ बैल असे आहे. रोज सरासरी ७ गुरे दगावत आहेत.

तालुक्यात आमच्या विभागाचे १८ पशुवैद्यकीय अधिकारी व मी स्वतः शक्य होईल तितक्या गावांना भेटी देऊन पशू उपचारासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे. पशुधन वाचविण्याचा यथाशक्ती प्रयत्न करण्यात आम्ही कुठलीही कसूर ठेवत नाही. लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे, हे सत्य आहे.- डॉ. हरिश ठाकरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, मेहकर, जि. बुलडाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com