Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत १५ हजार ७८८ पशुधनाचा मृत्यू

लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावाने राज्यात शनिवार (ता. १२) अखेर १५ हजार ७८८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

पुणे ः लम्पी स्कीन आजाराच्या (Lumpy Skin Disease) प्रादुर्भावाने राज्यात शनिवार (ता. १२) अखेर १५ हजार ७८८ पशुधनाचा मृत्यू (Livestock Died) झाला आहे. याची नुकसानभरपाई (Compensation) म्हणून ५ हजार ३१८ पशुपालकांना १३ कोटी ६५ लाख रुपये बॅंक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रसाद सिंह यांनी दिली.

Lumpy Skin
lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ मुळे ५० जनावरे दगावली

आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘राज्यात ‘लम्पी स्कीन’ची बाधा झाल्यापासून ३३ जिल्ह्यांमधील बाधित गावांतील एकूण २ कोटी ३७ लाख ८२९ बाधित पशुधनापैकी १ कोटी ६ लाख ७० हजार पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत. तर बाधित पशुधनापैकी १५ हजार ७८८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. ‘लम्पी स्कीन’चा फैलाव होऊ नये आणि तो आटोक्यात राहण्यासाठी तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती.

लसीकरणामध्ये १ कोटी ४४ लाख १२ हजार लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधील १ कोटी ३७ लाख १७ हजार पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. तर खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणानुसार राज्यातील सुमारे ९८ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.’’

Lumpy Skin
lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे १८३ जनावरे दगावली

या जिल्ह्यांमध्ये १०० टक्के लसीकरण

जळगाव, नगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशीम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

सुधारित प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत

लम्‍पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आणि साथ आता आटोक्यात आली असून, भविष्यात पुन्हा अशी साथ येऊ नये यासाठी गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरणासाठी पशुपालक व ग्रामपंचायतींनी मोहीम हाती घेतली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सुधारित उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत.

शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांनी पशुधनावर प्राधान्याने उपचार करून घ्यावेत. असे आवाहन आयुक्त सच्चिंद्र प्रसाद सिंह यांनी केले आहे.

‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ अभियान राबवा

‘लम्पी स्कीन’ प्रादुर्भाव नियंत्रणासाठी ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ अभियान राबविण्याच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रसाद सिंह यांनी दिल्या. तर गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील या आजाराचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याने सार्वजनिक ठिकाणी सामूहिक वावर टाळावा, असे प्रसाद यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com