Animal Husbandry : ‘झेडपी’च्या पशुसंवर्धन विभागाचा १० कलमी कार्यक्रम

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी जागतिक पशुवैद्यकीय संस्थांच्या सूक्ष्म नियोजन कार्यशाळेत पशुसंवर्धन विभागासाठी दहा कलमी अजेंडा निश्चित केला आहे.
Pune ZP
Pune ZPAgrowon

Pune News : जिल्ह्यातील पशुधनाचे आरोग्य (Livestock Health) सुधारण्याबरोबरच दुग्ध उत्पादनातून आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १० कलमी कार्यक्रमाची आखणी केली आहे. यामध्ये पशुधनाबरोबर मत्स्यपालनादेखील चालना दिली जाणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी जागतिक पशुवैद्यकीय संस्थांच्या सूक्ष्म नियोजन कार्यशाळेत पशुसंवर्धन विभागासाठी (Animal Husbandry Department) दहा कलमी अजेंडा निश्चित केला आहे.

Pune ZP
Animal Care : जनावरांमध्ये दिसतोय उष्णतेचा ताण

या अजेंड्यामध्ये दहा-सूत्री कार्यसूची जिल्ह्यातील पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते, प्रत्येक उद्दिष्टासाठी कालमर्यादा निश्चित करणे, नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे, कृत्रिम रेतनाद्वारे उत्पादकता सुधारण्यापर्यंत आदि विविध उपक्रमांचा या कार्यक्रमात समावेश आहे.

Pune ZP
Animal Care In Summer : उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांची कशी घ्यावी काळजी?

ग्रामपंचायतीच्या मदतीने नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. पशुवैद्यकीय सेवांमधुन पशुधनाचे आरोग्य याद्वारे सुधारण्यात येणार आहे. तसेच जुन्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Pune ZP
Agrowon Podcast : सोयाबीन दरातील नरमाई कायम

यासाठी ३१ मे पर्यंत प्रशासकीय मंजुरी दिली जाणार आहे. तसेच मोबाईल पशुवैद्यकीय दवाखान्याचा कार्यक्षम वापर करण्यावर भर दिला जाणार असून, ज्या दुर्गम ठिकाणी दवाखान्यांना जागा उपलब्ध होणार नाही अशा ठिकाणी मोबाईल दवाखान्याद्वारे सेवा दिली जाणार आहे.

या फिरता पशुवैद्यकीय दवाखान्यांद्वारे उपचार, वैद्यकीय प्रमाणपत्रे, लसीकरण, आदी सर्व आवश्यक सेवा दिल्या जाणार आहेत.

पशुधन पालना बरोबरच मत्स्यपालनाला देखील प्रोत्साहन दिले जाणार असून, सर्व जलसंस्थांची ओळख पटवणे आणि योग्यरीत्या लिलाव करणे, मत्स्यव्यवसायास प्रोत्साहन देणे समाविष्ट करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com