
Lumpy Skin Vaccination सोलापूर : ज्या गावांमध्ये बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) घेण्यात येणार आहे. त्या गावातील सर्व गोवंशीय जनावरांचे (Bovine Animal) १०० टक्के लम्पी लसीकरण (Lumpy Skin Vaccination) आवश्यक आहे.
शर्यतीत सहभागी होणाऱ्या सर्व बैलांच्या जोड्यांचेही लम्पी लसीकरण आवश्यक आहे. या संदर्भात शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, शासकीय पशुवैद्यकीय संस्थेचा दाखला आवश्यक असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. परवानगी देताना या अटींचे पालन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
बैलगाडा शर्यत भरविण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिता विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदींमुळे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
जनावरांच्या बाजाराची प्रतीक्षा
सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गाय व बैलांचे आठवडे बाजार भरविले जातात. म्हैस व रेड्याचे आठवडा बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.