Lumpy Skin : ‘लम्‍पी स्कीन’मुळे राज्यात २७१ जनावरांचा मृत्यू

लम्पी स्कीन आजाराने राज्यभरात सोमवार (ता.१९) अखेर २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजार २९१ जनावरे आजारमुक्त झाली आहेत.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

पुणे ः ‘‘लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) राज्यभरात सोमवार (ता.१९) अखेर २७१ जनावरांचा मृत्यू (Animal Death Due To Lumpy Skin) झाला आहे. तर ३ हजार २९१ जनावरे आजारमुक्त (Lumpy Disease Free Animal) झाली आहेत,’’ अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांनी दिली. तर ‘‘तातडीच्या लसीकरणासाठी (Lumpy Skin Vaccination) २५ लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. या विविध जिल्ह्यांमधील प्रादर्भावाचे प्रमाण पाहून वितरित केल्या जातील,’’ असेही त्यांनी सांगितले.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी छावण्यांचा प्रयोग राबवा

सिंह म्हणाले, ‘‘ राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १ हजार १०८ गावांत ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरु आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : गोमाता दूध संस्थेमार्फत वडगावात मोफत लसीकरण

आतापर्यंत २७१ पशुधन मृत झाले आहे. तर तातडीच्या लसीकरणासाठी विविध जिल्ह्यांमध्ये ४९ लाख ८३ लाख लशींच्या मात्रा उपलब्ध आहेत. यापैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील १ हजार १०८ गावांतील १६ लाख ४५ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.’’

मुंबई नियंत्रित क्षेत्र जाहीर

‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com