Lumpy Skin : धुळे जिल्ह्यात ३१४ जनावरे बाधित

धुळे : जिल्ह्यात गोवर्णीय जनावरांसंबंधी संसर्गजन्य ‘लम्पी स्कीन’ या आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासन कमी पडत आहे. ‘लम्पी स्कीन’ने एकूण २९ गावे बाधित झाली असून, ३१४ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

धुळे : जिल्ह्यात गोवर्णीय जनावरांसंबंधी संसर्गजन्य ‘लम्पी स्कीन’ या आजाराच्या (Lumpy Skin Disease) प्रतिबंधासाठी प्रशासन कमी पडत आहे. ‘लम्पी स्कीन’ने (Lumpy Skin Infection) एकूण २९ गावे बाधित झाली असून, ३१४ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. हा आजार पशुधनात (Livestock Infected By Lumpy Skin) पसरतच आहे.

लसीकरण संथ सुरू आहे. पशुधन पालकांची वित्तीय लूट सुरू आहे. कारण खासगी पशुवैद्यक उपचार करीत असून, त्यावर कुठलेही नियंत्रण नाही. शेतकरी, पशुपालक आपले पशुधन वाचविण्याची धडपडत करीत आहेत. कारण पुरेसे संख्याबळ शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नाही.

Lumpy Skin Disease
Lumpy Vaccination : एक लाख ३० हजार पशुधनाला साताऱ्यात लस

मोफत औषधे मिळेनात, सूचनांचा भडिमार

बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चराईसाठी पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. गायी व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व बाधित नसलेली जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहांची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी. बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे व रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचिड आदींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी, अशा सूचनांचा भडिमार सुरू आहे. परंतु पशुधनावर हवे तसे उपचार, मोफत औषधे विचरण याची जिल्ह्यात बोंबाबोंब दिसत आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : अकोला जिल्ह्यातील तीन हजार पशुधनांना प्रादुर्भाव

२९ गावे बाधित

जिल्ह्यात धुळे, वरखेडी, वडजाई, शिरूड, विंचूर, सोनगीर, हडसुणे, मुकटी, मेहरगाव, पुरमेपाडा, नगाव, बोधगाव, जुनवणे, तिखी, अंचाळे (ता. धुळे), दोंडाईचा, विखरण, निरगुडी, पाटण, नेवाडे, सुराय, कोडदे (ता. शिंदखेडा), नवापाडा (नवेनगर), अंबापूर, छाईल, छडवेल, भामेर, उभंड, खोरी (ता. साक्री) ही गावे ‘लम्पी स्कीन’च्या संक्रमणाने ग्रासली आहेत. ‘लम्पी स्कीन’च्या लसीकरणानंतर आजार बरा होतो. त्यामुळे शेतकरी, पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जनावरांची उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होणार असल्याने दुग्ध व्यवसायाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे बाधित व बाधित नसलेल्या जनावरांना लसीकरण करण्याची नितांत गरज आहे. पण लसीकरण संथ सुरू आहे. जिल्ह्यात गोवर्गीय तीन लाख ५२ हजार ५४४ जनावरे आहेत. पैकी उपलब्ध एकूण लसींपैकी सरासरी ७० ते ८० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, असा दावा पशुसंवर्धन विभाग करीत आहे.

मोबाईल, टोल फ्री क्रमांक जाहीर

जिल्ह्यात पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभागाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. तसेच पशुपालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी १९६२ व १८०० २३३ ०४१८ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. शिवाय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पशुसंवर्धन अधिकारी, रोगनियंत्रण अधिकाऱ्यांशी ८२७५५ ६३५०४, ९८२२२ ९०२२८, ९४२२४ ०३८६९ या क्रमांकावर पशुपालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com