Lumpy Skin : मृत्यू झालेल्या जनावरांची ३.४३ कोटींची भरपाई

जिल्ह्यात लम्पी स्कीनमुळे सुमारे १९१४ जनावरे आतापर्यंत दगावली आहेत. या आजाराने मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून मदत दिली जात आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

अकोला ः जिल्ह्यात लम्पी स्कीनमुळे (Lumpy Skin) सुमारे १९१४ जनावरे आतापर्यंत दगावली आहेत. या आजाराने मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून मदत दिली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीन कोटी ४३ लाख रुपयांची भरपाई (Compensation) खात्यात जमा करण्यात आली आहे.

Lumpy Skin
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

जनावरांच्या लम्पी स्कीन या आजारामुळे जिल्ह्यात सुमारे ३२ हजार गुरे बाधित झाली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याची गांभीर्याने दखल राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पशुसंवर्धन खात्याचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग तसेच केंद्राचे पथकही जिल्ह्यात भेटी देऊन आढावा घेऊन गेले.

प्रशासनाने जिल्ह्यात दोन लाख ५६ हजार ६३१ जनावरांचे लसीकरण केले. यामुळे बाधित जनावरांपैकी २८ हजार ८६० जनावरे पूर्ण बरी झाली. मात्र १९१४ जनावरांचा मृत्यूसुद्धा झाला होता. शासनाने ज्यांची जनावरे दगावली अशांना मदतीचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्याला तीन कोटी ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. यापैकी तीन कोटी ४३ लाख रुपये वितरितही करण्यात आले आहेत.

अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी याबाबत आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी, डॉ. तुषार बावणे व इतर उपस्थित होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाने लम्पी स्कीनबाबत केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ. पांढरपट्टे यांनी लम्पी स्कीनच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवणे सुरू ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com