Lumpy Skin : लम्पी स्कीनने जनावर दगावलेल्या ३९० पशुपालकांना मदतीची प्रतीक्षा

दगावलेल्या ९१० जनावरांपैकी ५२० प्रकरणांत पशुपालकांना १ कोटी २२ लाख रुपये मदत देण्यात आली आहे.
Lampy Skin
Lampy SkinAgrowon

Washim Lumpy Skin News : जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) या आजारामुळे जनावरे दगावलेल्या ९०९ पशुपालकांपैकी ५२० जणांना आतापर्यंत १ कोटी २२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

अद्याप ३९० पशुपालकांना शासनाकडून मदत (Lumpy Skin Compensation) मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. हा निधी कधी मिळतो याची विचारणा केली जात आहे.

Lampy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे ५१० जनावरे दगावली

जिल्ह्यात ऑगस्टपासून जनावरांना लम्पी स्कीनची लागण होण्याचे वाढले होते. ज्या पशुपालकांचे पशुधन या आजारामुळे दगावले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.

आतापर्यंत जिल्ह्यातील १४,८५३ जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला असून ९१० जनावरांचा या रोगाने मृत्यू झाला. १३ हजार ५७८ जनावरे औषधोपचारामुळे बरी झाली.

Lampy Skin
Lampy Skin : ‘लम्पी स्कीन’बाधित ४ हजार ९६४ जनावरे उपचारानंतर बरी

दगावलेल्या ९१० जनावरांपैकी ५२० प्रकरणांत पशुपालकांना १ कोटी २२ लाख रुपये मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात १४,८५३ जनावरांना लम्पी स्कीनचा संसर्ग झाला होता.

त्यापैकी ९०९ जनावरांचा मृत्यू झाला, तर १३ हजार ५७८ जनावरे औषधोपचारातून बरी झाली असून ३६५ जनावरांवर उपचार सुरू आहेत. लम्पी स्कीनमुळे जनावरे दगावलेल्या ९०९ पैकी ५२० पशुपालकांना आतापर्यंत १.२२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.

तर, अद्यापही ३८९ पशुपालकांना मदत मिळणे बाकी आहे. मागील आठवड्यात शासनाकडून ३२ लाखांचा निधी पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. त्यातून उर्वरित पशुपालकांना मदत मिळण्याची आशा आहे.

आतापर्यंत वाशीम ११०, कारंजा २५८, मानोरा २०८, मंगरूळपीर ९२, रिसोड १३३, मालेगाव १०९ जणांना मदत देण्यात आली. गायीसाठी ३० हजार, बैलासाठी २५ आणि १३ महिन्यांखालील वासरासाठी १६ हजारांची मदत दिली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com