Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे ४१९ जनावरांचा मृत्यू

परभणी -हिंगोली जिल्ह्यांत लम्पी स्कीन आजारामुळे शुक्रवार (ता.३०)पर्यंत एकूण ४१९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून ३०२ पशुपालकांना ४७ लाख ४९ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon

परभणी ः परभणी -हिंगोली जिल्ह्यांत लम्पी स्कीन आजारामुळे (Lumpy Skin Disease) शुक्रवार (ता.३०)पर्यंत एकूण ४१९ जनावरांचा मृत्यू (Animal Death) झाला आहे. शासनाकडून ३०२ पशुपालकांना ४७ लाख ४९ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील २२५ पशुपालकांना ३१ लाख ३९ हजार रुपये आणि हिंगोली जिल्ह्यातील ७७ पशुपालकांना १६ लाख १० हजार रुपये दिले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा पुन्हा नको विळखा

परभणी जिल्ह्यातील लम्पी स्कीनमुळे बाधित जनावरांची संख्या शुक्रवार (ता. ३०) अखेर ३ हजार ४२७ पर्यंत होती. त्यापैकी २५१ जनावरे दगावली. त्यात गायी ३६, बैल ७८, तर १३३ वासरांचा समावेश आहे. उपचारानंतर १ हजार ९२४ जनावरे बरी झाली. सध्या १ हजार २५१ जनावरे सक्रिय असून, त्यापैकी ५६ जनावरांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावात ७६ हजारांनी वाढ

जिल्ह्यातील जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती. एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांच्या लसीकरणांसाठी २ लाख ९९ हजार ३० लसी प्राप्त झाल्या. शुक्रवारी (ता.३०) पर्यंत १ लाख ३८ हजार ९१६ गायवर्गीय आणि १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय आणि ५ हजार ४६९ म्हशी, असे एकूण २ लाख ९७ हजार २५४ जनावरांचे (९९.१३ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Vaccine : लम्पी स्कीन’ लसीची राज्यात निर्मिती

हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता. ३१) पर्यंत ३६६ गावांतील ३ हजार ६३ जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला. उपचारानंतर १ हजार ३३० जनावरे बरी झाली. परंतु १६७ जनावरांचा मृत्यू झाला. त्यात ३४ गायी, ३८ बैल, ९५ वासरे आहेत. १५५ पशुपालकांनी मदतीसाठी प्रस्ताव सादर केले.

त्यापैकी ७७ पशुपालकांना १६ लाख १० हजार रुपये मदत देण्यात आली. सध्या प्रादुर्भावग्रस्त १ हजार ५६६ जनावर आहेत. त्यापैकी ६० जनावरांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या २ लाख ३२ हजार २०३ आहे. एकूण २ लाख ३८ हजार ६५३ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

‘लम्पी स्कीन’मुळे दगावलेली तालुकानिहाय जनावरे

तालुका गाय बैल वासरू एकूण

परभणी १७ १४ ३५ ६६

जिंतूर ५ ८ २९ ४२

सेलू २ ११ ६ १९

मानवत २ १७ २० ३९

पाथरी २ ५ ४ ११

सोनपेठ २ ६ २ १०

गंगाखेड ४ ८ २४ ३६

पालम १ ५ ७ १३

पूर्णा १ ६ ९ १६

हिंगोली ५ ७ १७ २९

कळमनुरी ५ ४ १२ २१

वसमत ११ ५ ३५ ५१

औंढा नागनाथ ६ १२ १८ ३६

सेनगाव ७ १० १३ ३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com