Lumpy Skin Disease : सोलापुरात लम्पी स्कीनने पुन्हा ४३ जनावरे बाधित

Lumpy Skin : जिल्ह्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आटोक्यात असला, तरीही जिल्ह्यात आतापर्यंत ७४० जनावरे लम्पी बाधित झाली आहेत. त्यात सर्वाधिक २२७ जनावरे मंगळवेढा तालुक्यातील आहेत.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

Solapur News : जिल्ह्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) आटोक्यात असला, तरीही जिल्ह्यात आतापर्यंत ७४० जनावरे लम्पी बाधित झाली आहेत. त्यात सर्वाधिक २२७ जनावरे मंगळवेढा तालुक्यातील आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यात पुन्हा वाढ झाली असून, या दोन दिवसांत सर्वाधिक ४३ जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली असल्याचे आढळले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लम्पी स्कीनग्रस्त जनावरांच्या संख्येत चढ-उतार होतो आहे. पण एकूणच परिस्थिती पाहता, जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात ही संख्या असली, तरी काही ठरावीक भागातच ही जनावरे अधिक आढळत आहेत.

Lumpy Skin
Animal Care : उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम

जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात ४५, बार्शी तालुक्यात ४७, करमाळा तालुक्यात १२, माढा तालुक्यात ५५, माळशिरस तालुक्यात २७, मंगळवेढा तालुक्यात २२७, मोहोळमध्ये १०६, उत्तर सोलापुरात आठ, पंढरपुरात ६३ आणि सांगोल्यात १०१, दक्षिण सोलापुरात ४९ अशी एकूण ७४० जनावरे बाधित आहेत. नव्याने आढळलेली ४३ जनावरे पंढरपूर, मोहोळ, सांगोला, माळशिरस तालुक्यांतील आहेत.

Lumpy Skin
Animal Care : उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात?

आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ४४३ जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाली होती. त्यापैकी ३५ हजार ९१७ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर लम्पी स्कीनमुळे ३ हजार ७८६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सध्या मंगळवेढ्यात वाढत असलेल्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी स्वतंत्र नियोजन केल्याचेही सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com