Lumpy Skin DIsease : अकोला जिल्ह्यात दगावली ४६ जनावरे

एक हजार पशुधनांवर उपचार; ८७,५८४ लसीकरण पूर्ण
lumpy skin disease in animal
lumpy skin disease in animalAgrowon

अकोला : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा (Lumpy Skin DIsease) विळखा वाढत असून, पशुपालकांमध्ये धास्तीचे वातावरण बनलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत ४६ जनावरे दगावली आहेत. तसेच सध्या १००१ जनावरांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात १९ सप्टेंबरपर्यंत ८७,५८४ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या संख्येत दरदिवसाला भर पडत आहे.

lumpy skin disease in animal
Lumpy Skin : लसीकरणावर भर देउन ‘लंम्पी स्किन’ ला रोखा

विदर्भात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अकोल्यात अधिक वेगाने होत आहे. या जिल्ह्यात अकोला तालुक्यातील निपाणा येथील जनावराचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर यंत्रणेने उपाययोजनांना वेग दिला. आतापर्यंत निपाणा व पैलपाडा गावात पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन आढावा घेतला आहे. पशुसंवर्धन विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा परिणाम उपाययोजना राबवताना पडलेला आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तींचीही सेवा घेतली जात आहे. लम्पी स्कीनमुळे जिल्ह्यात ५५५ गायी व ९०० पेक्षा अधिक बैलांना प्रादुर्भाव झालेला आहे.

lumpy skin disease in animal
‘लंम्पी स्किन’च्या नियंत्रणासाठी गोठा स्वच्छ ठेवा : डॉ.काळूसे

या प्रादुर्भावाचे प्रमाण अकोट, तेल्हारा, अकोला तालुक्यांत अधिक आहे. अकोट तालुक्यात ५९१ तर तेल्‍हारा तालुक्यात ४११ जनावरांना प्रादुर्भाव झालेला आहे. या दोन तालुक्यांत गावागावांत प्रादुर्भाव पसरत आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झालेले जनावर आढळून आल्यानंतर काही किलोमीटर परिसरात उपाययोजना लागू केल्या जातात. सध्या जिल्हाभरातच जनावरांच्या वाहतुकीवर, खरेदी-विक्रीवर बंधने घालण्यात आलेली आहेत. तरीही दर दिवसाला लम्पीस्कीनच्या जनावरांची संख्या वाढती आहे.

lumpy skin disease in animal
‘लंम्पी’ आजाराने दगावलेल्या जनावरांची भरपाई द्या

अकोट तालुक्यात ५९१ पशुधनांना प्रादुर्भाव

जिल्ह्यात प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचा आकडा दीड हजारापर्यंत पोहोचत आहे. अकोट तालुक्यातील ५९१ जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच मृत्यूसुद्धा सर्वाधिक अकोट तालुक्यातीलच आहेत, त्यापाठोपाठ तेल्हारा तालुक्यात ४११ गुरांना लागण व १६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उपाययोजना राबवताना मोठी दमछाक होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com