Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे ४७९ जनावरे दगावली

परभणी जिल्ह्यातील २९९ आणि हिंगोली जिल्ह्यातील १८० जनावरे मिळून एकूण ४७९ जनावरे दगावली आहेत. सध्या या आजाराची २ हजार ४७० जनावरे सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.
Animal Death
Animal Death Agrowon

परभणी ः लम्पी स्कीन (lampy Skin) आजारामुळे परभणी -हिंगोली जिल्ह्यांतील ६ हजार ९५७ जनावरे बाधित झाली आहेत. या दोन जिल्ह्यांतील ४ हजार ८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत.

मात्र परभणी जिल्ह्यातील २९९ आणि हिंगोली जिल्ह्यातील १८० जनावरे मिळून एकूण ४७९ जनावरे दगावली (Animal Death) आहेत. सध्या या आजाराची २ हजार ४७० जनावरे सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता.१७) अखेर लम्पी स्कीन आजारामुळे बाधित जनावरांची संख्या ३ हजार ७११ झाली. उपचारानंतर १ हजार ९४७ हजार बरी झाली आहेत. तर २९९ जनावरे दगावली आहेत.

सध्या या आजाराच्या सक्रिय जनावरांची संख्या १ हजार ४६५ असून, त्यापैकी ५६ जनावरे गंभीर आहेत. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील १ हजार ४५५ गायी आणि २ हजार २५६ बैल या आजारांमुळे बाधित झाले आहेत.

जिल्ह्यातील १४४ ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६२६ आहे. एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती.

दगावलेल्या जनावरांमध्ये गायी ४४, बैल ८४, वासरे १७१ आहेत. २ लाख ९९ हजार ३०० लसी प्राप्त झाल्या होत्या. मंगळवार (ता. १७)पर्यंत १ लाख ३८ हजार ९१६ गायवर्गीय आणि १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय आणि ५ हजार ४६९ वासरे, असे एकूण २ लाख ९७ हजार २५४ जनावरांचे (९९.१३ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

Animal Death
Lampi In Maharashtra : लंपी रोगामुळे 22 जनावरांचा मृत्यू | ॲग्रोवन

हिंगोलीत १८० जनावरे दगावली...

हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ९२ ईपी सेंटरसह ३६६ बाधित गावातील सोमवार (ता. १६)पर्यंत ३ हजार २४६ जनावरांना लम्पी स्कीन आजारामुळे बाधित झाली आहेत.

उपचारानंतर २ हजार ६१ जनावरे बरी झाली. परंतु १८० जनावरांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या या आजाराची १ हजार ५ जनावरे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी २२ जनावरे गंभीर आजारी आहेत.

एकूण २ लाख ३८ हजार ६५३ जनावरांचे (१०२.७८ टक्के) लसीकरण करण्यात आले. या अंतर्गत अर्थसाह्यासाठी १५७ प्रस्ताव प्राप्त असून, त्यापैकी १४५ प्रस्ताव मंजूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com