Lumpy skin : आठ हजार जनावरांना नगर जिल्ह्यात प्रादुर्भाव

लसीकरण केल्यानंतरही लम्पी स्कीनची बाधा होण्याचे प्रमाण सुरूच आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८ हजार ५८ जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

नगर ः लसीकरण केल्यानंतरही लम्पी स्कीनची बाधा (Lumpy Skin Infection) होण्याचे प्रमाण सुरूच आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८ हजार ५८ जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) झाला आहे. त्यात चार म्हशींचा अपवाद वगळता बाधा झालेली सर्व जनावरे गायवर्गातील आहेत. नगर जिल्ह्यात ४१८ जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

प्रादुर्भाव झालेल्या गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघात ‘अलर्ट’ कायम आहे. त्यामुळे सुमारे १,१०९ गावांच्या शिवारात लसीकरण झाल्याने लम्पी स्कीनची तीव्रता कमी झाली असे समजले जात असले तरी जनावरांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : स्थलांतरित बैलांची जबाबदारी कोणाची?

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातून या आजाराची सुरुवात झाली. टप्प्या टप्प्याने संपूर्ण जिल्हा या आजाराने व्यापला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २१५ गावांत ८ हजार ५८ जनावरे बाधित झाली. लम्पी स्कीनने बाधित झालेल्या गावांच्या परिसरात पाच किलोमीटर अंतरात अलर्ट जाहीर केला जातो. त्‍यानुसार नगर जिल्ह्यात १,१०९ गावांत अलर्ट जाहीर केला आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’साठी कारखान्यांनी समन्वय अधिकारी नेमावा

बाधित झालेल्या ८ हजार ५८ जनावरांपैकी ४ हजार ६०४ जनावरे बरी झालेली असून ४१८ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. ३ हजार ४० जनावरांवर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात ९ लाख ६३ हजार ७५२ जनावरांचे लसीकरण झालेले आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी सांगितले.

सर्वाधिक प्रादुर्भाव कर्जत तालुक्यात असून जनावरांच्या मृत्यूचे प्रमाणही कर्जत तालुक्यातच अधिक आहे. अलर्ट असलेली सर्वाधिक गावे राहुरी तालुक्यात आहेत. कोपरगाव, जामखेड तालुक्यात लम्पी स्कीनची तीव्रता कमी आहे. कोपरगावात एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही, तर जामखेडला एका जनावराचा मृत्यू झाला आहे.

तालुकानिहाय बाधित जनावरे (कंसात मृत्यू)

नगर ः ९९ (४), शेवगाव ः २७७ (७), कोपरगाव ः १९ (०), पाथर्डी ः २२१ (६), जामखेड ः ६१ (१), श्रीगोंदा ः ११२५ (६२), पारनेर ः ५६३ (२६), राहाता ः २४४ (१२), कर्जत ः २५२८ (१४५), नेवासा ः ३४१ (१५), संगमनेर ः १०१६ (४७), राहुरी ः ३७८ (२०), श्रीरामपूर ः ३२५ (१८), अकोले ः ८६५ (५५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com