Lumpy Skin : लम्पी स्कीन’ मुळे ८३ जनावरे दगावली

परभणी जिल्ह्यातील ‘लम्पी स्कीन’ आजारामुळे बाधित जनावरांची संख्या १ हजार ९१३ पर्यंत वाढली आहे.
lumpy Skin
lumpy SkinAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) आजारामुळे बाधित जनावरांची संख्या १ हजार ९१३ पर्यंत वाढली आहे. त्यात ७४६ गायी आणि ११६७ बैलांचा समावेश आहे. उपचारानंतर ९१९ जनावरे उपचाराने पूर्ण बरी झालेली आहेत. तर ८३ जनावरांचा मृत्यू झाला. सद्यःस्थितीत जिल्ह्यात लम्पी स्कीनचे ९११ जनावरे बाधित आहेत. एकूण २ लाख ८९ हजारांवर जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

डॉ. नेमाडे म्हणाले, की जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना ही राबविण्यात येत आहेत. जनावरांचे लसीकरण करणे ही महत्त्वाची उपाययोजना आहेत. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय आणि १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय, असे एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांच्या लसीकरणांसाठी जिल्ह्याला २ लाख ९४ हजार ३०० लसी प्राप्त झालेल्या आहेत.

lumpy Skin
Crop Insurance: पीकविम्याबाबत घेतली कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक

यानुसार आजवर १ लाख ३५ हजार ३९८ गायवर्गीय आणि १ लाख ५० हजार ९३३ बैलवर्गीय, असे एकूण २ लाख ८९ हजार १५६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परभणी जिल्ह्यात एकूण ३ लक्ष ९८ हजार ३५६ पशुधन असून, त्यात १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय, १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय आणि ९८ हजार ४९५ म्हैस वर्गीय जनावरे आहेत.

जिल्ह्यातील अबाधित जनावरांचे लसीकरण, गोचीड गोमाश्‍या निर्मूलन, गोठ्यांचे निर्जंतुकीकरण, माझा गोठा-स्वच्छ गोठा मोहिमेसह प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. गाभण गायी, लहान वासरे लसीकरण न झालेली जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून लसीकरण करुन घ्यावे, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com