Sarangkheda Horse Festival : सारंगखेड्यातील घोडेबाजारात दीड कोटीची घोडी दाखल

सारंगखेडा (ता.शहादा) येथील घोडेबाजारात भटिंडा (पंजाब) येथून आलेली दीड कोटी किंमत असलेली शाहीन व बडनगर (जि. उज्जैन, मध्य प्रदेश) येथून आलेला ५१ लाखांचा शेरा येथील आकर्षण ठरत आहेत.
Sarangkheda Horse Market
Sarangkheda Horse MarketAgrowon

शहादा, जि.नंदुरबार : सारंगखेडा (ता.शहादा) येथील घोडेबाजारात (Sarangkheda Horse Market) भटिंडा (पंजाब) येथून आलेली दीड कोटी किंमत असलेली शाहीन (Shahin Horse) व बडनगर (जि. उज्जैन, मध्य प्रदेश) येथून आलेला ५१ लाखांचा शेरा (Shera Horse) येथील आकर्षण ठरत आहेत.

Sarangkheda Horse Market
Animal Care : बैलांमधील खांदेसुजीवर उपाययोजना

शाहीन व शेराचे देखणे रूपडे, रुबाबदार चाल अश्वशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात ७१ इंच उंची असलेली शाहीन एकमेव असल्याचे तिचे मालक निर्भय सिंग यांनी सांगितले.

Sarangkheda Horse Market
Animal care : गाई, म्हशींमध्ये आनुवंशिक सुधारणा महत्वाची...

सारंगखेडा (ता. शहादा) येथील अश्वबाजार जातिवंत, रुबाबदार घोड्यांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथे प्रदर्शनात आणले जाणारे महागडे घोडे त्यांचे मालक सहसा विकत नाहीत, फक्त आवडीसाठी ते त्यांना पाळतात. त्यांच्यात असलेली सुंदरता व देखणे रूप मजबुती असल्यानेच ते प्रदर्शनामध्ये दाखल होतात.

या वर्षीही विविध घोडे दाखल झाले आहेत. पंजाबमधून आलेले निर्भयसिंग यांनी आपल्या मित्राच्या सांगण्यावरून येथील प्रदर्शनात गुलजार वंशाची भारतातील सर्वांत उंच असलेली शाहीन आणली आहे. तिची उंची ७१ इंच असून, तिची किंमत दीड कोटीपर्यंत आहे. अश्वबाजारात ७० लाखांपर्यंत तिची मागणी झाली आहे. शाहीनला दररोज चणे, दही, दूध, हंगामी फळांचा आहार दिला जातो. सध्या सफरचंदाचा हंगाम असल्याने दररोज पाच किलो सफरचंदे खात असून, दहा ते बारा लिटर दूधही ती घटाघटा पिते, असे निर्भय सिंग यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com